Views:
443
- पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश
डॉ. हेमंत चिखलीकरांवरही फसवणुकीचा गुन्हा
पिंपरी- बनावट संस्थेचे “लेटरहेड’ बनवून त्याद्वारे फिजिशियन डॉ.शंकर जाधव यांचा बदनामीकारक मजकूर समाजात पसरवल्याने महापालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत, तर डॉ. हेमंत चिखलीकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी परिमंडल तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील फिजिशियन डॉ. शंकर जाधव यांना “वायसीएम’ रुग्णालयाच्या उपवैद्यकीय अधीक्षकपदावर पदोन्नती देण्यात येणार होती. परंतु, महापालिकेतील डॉ. हेमंत चिखलीकर यांनी जाधव यांना पदोन्नती मिळू नये. याकरिता बनावट “लेटरहेड’चा वापर करुन त्यावर खोट्या व बिनबुडाचा मजकूर लिहून ते पत्र 19 डिसेंबर 2015 महापालिका आयुक्तांना देण्यात आले. तसेच, सदरील बनावटी “लेटरहेड’ आणि त्यातील मजकूर हा पुढे महापालिका वैद्यकीय विभागाच्या “ई-मेल’ पत्यावरुन सर्व हॉस्पीटलमध्ये पसरवला. त्यामुळे डॉक्टर हेमंत चिखलीकर यांनी माझी बदनामी करुन मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार डॉ. जाधव यांनी तत्कालीन आयुक्तांकडे दिली होती.
तसेच, बोगस संस्थेचे बनावट “लेटरहेड’ बनवून त्याद्वारे बदनामीकारक मजकूर समाजात पसरवला होता. याबाबत डॉ. जाधव यांनी चिंचवड पोलीस स्टेशनला सदरील तक्रार दाखल केली. होती. तसेच, राष्ट्रीय जाती आयोग दिल्ली यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या ठिकाणी न्याय मिळत नसल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली.
दरम्यान, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.7) दिलेल्या आदेशात डॉ. हेमंत चिखलीकर यांच्यावर 166, 420, 500, 504, 506, 34 आणि डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी परिमंडळ तीन मधील पिंपरीचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना आदेश देवून 156 अंतर्गत चौकशी करुन 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत एसीपी गणेश शिंदे म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पत्र अद्याप मिळालेली नाही. परंतू, सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पत्र मिळाल्यानंतर त्या आदेशानूसार गुन्हा दाखल करुन कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर असोशिएशन अडचणीत
पिंपरी-चिंचवड डॉंक्टर असोशिएशन संघटनेचे धर्मादाय आयुक्तालयाकडे कुठलीही नोंदणी नसताना त्या संघटनेचे लेटरहेड वापरुन त्या लेटरहेडवर डॉं शंकर बळवंत जाधव यांचा बदनामीकारक मजकूर लिहून तो समाजात आणि वैद्यकीय विभागाच्या ई-मेल वरुन पसरविण्यात आला होता. त्यामुळे त्या संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Like this:
Like Loading...