breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालखी सोहळा; दिंडीक-यांना मिळणार तंबू मारण्याचे साहित्य

  • महापौर नितीन काळजे यांनी दिली माहिती
  • महापालिकेत नियोजन बैठकीत घेतला निर्णय
  • सर्व विभागप्रमुखांना सुविधा पुरविण्याच्या दिल्या सूचना

पिंपरी – जग्दगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीक-यांना यावर्षी तंबू मारण्याचे साहित्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातून पालखी पुढे मार्गस्त होईपर्यंत लागणा-या सर्व सोयीसुविधा पालिकेतर्फे देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

आषाढी वारीतील पालखी सोहळ्यानिमित्त आज गुरूवारी (दि. 7) महापालिकेत महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाचे नियोजनावर चर्चा झाली. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, सर्व प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक विलास मेडिगेरी, नामदेव ढाके, सुरेश भोईर, नगरसेविका आशा शेंडगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, गणेश गावडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, महावितरण भोसरीचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वरीष्ठ पोलीस अधिकारी व्हि. प. पळसुले, अजित लकडे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये उपस्थितांनी निगडी येथील भक्ती-शक्ती चौक व आळंदी फाटा, भोसरी येथे भव्य उंच कमानी उभारण्यात याव्यात, आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी, पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना असावी. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची योग्य ती व्यवस्था करावी. पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात, पालखी मार्गावरील रस्त्याची कामे पूर्ण करावीत, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, महापौर काळजे यांनी दिल्या.

पालखी सोहळ्यासमवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह अॅम्बुलन्सची व्यवस्था करून देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फिरते शौचालय यांची व्यवस्था, सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवणे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवणे व पालखी मार्गक्रमणामध्ये संबंधित सर्व विभागांनी चोख व्यवस्था करावी, अशा सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी केल्या. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित सर्व विभागप्रमुखांना तसे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button