पार्थ पवार यांचा पनवेल मध्ये झंझावती प्रचार दौरा !

पनवेल – काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील कळंबोली विभागात झंझावती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि मतदार परिसरातील प्रश्न जाणून घेतले. यावेळी नवाब मलिक, आमदार बाळाराम पाटील , पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे पनवेल अध्यक्ष सतीश पाटील , काँग्रेसचे अध्यक्ष आर सी घरत ,मनसेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत , मनसेचे सरचिटणीस केसरीनाथ पाटील तसेच अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचारादरम्यान कळंबोली येथील माजी सरपंच बंटी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली .त्यांच्या परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. कळंबोली येथील हनुमान मंदिरात नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थिती होतो. या वेळी आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ,सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे,आजी माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कळंबोली येथील कामगारांसोबत संवाद साधला..या वेळी कामगार नेते प्रकाश जाधव,आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ,सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे,आजी माजी पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. माथाडी कामगार संघटनेचे नेते बाळ मराठे ,संपतराव गोडसे यांच्या उपस्थितीत कामगारांची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ,सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे,आजी माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते..
कळंबोली येथील एफसीआय येथील एरिया मॅनेजर अनिल चव्हाण यांच्या चर्चा करून कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या प्रश्नांवर चर्चा केली. कळंबोली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीला उपस्थित होतो .या वेळी मनसे रायगड जिल्ह अध्यक्ष अतुल भगत,जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण,तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ,मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .
कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीला भेट दिली.तेथील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समिती सभापती गुलाबराव जगताप,आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील ,सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे,आजी माजी पदाधिकारी व माथाडी कामगार उपस्थित होते.