breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, दोघांनीही केले हस्तांदोलन आणि स्मितहास्य

- दोघांनीही एकमेकांकडे पाहत केले स्मित हास्य
- दोघांच्या भेटीनंतर कार्यकर्ते दोघांकडे पाहात राहिले
पिंपरी ( महा-ई-न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन बाहेर पडताना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयासमोर अचानक भेट झाली. यावेळी स्वताः पार्थ पवार यांनी समोरुन आलेल्या खासदार बारणे यांना हस्तांदोलन करीत त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले. दोन्ही तुल्यबळ उमेदवार आमने-सामने आल्यानंतर महाआघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमे-यात कैद केला.