पार्थ पवारांच्या रॅलीने उद्योगनगरीचे वातावरण ढवळून निघाले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्राचारात जोरदार आघाडी घेतली आहे. आज पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, पिंपळे गुरव, मासुळकर कॉलनी या भागात पदयात्रा, रॅली काढण्यात आली. या पदयात्रेला कार्यकर्त्यांचा तसेच पार्थ पवार यांच्या चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पदयात्रेमुळे परिसरातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले.
लोकसभा निवडणुकीच्या मावळ मतदार संघात आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या बाजुने सध्या उद्योगनगरीचे वातावरण फिरू लागले आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे पुतने असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र असल्याने राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारात पुढाकार घेतला आहे. आज काढण्यात आलेल्या पदयात्रा आणि रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
आज सकाळी अकरा वाजता नवी सांगवीत पदयात्रेला सुरूवात झाली. स्व. वसंतदादा यांच्या पुतळ्याला उमेदवार पार्थ पवार यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एकता चौक, पवारनगर, ढोरेनगर, शितोळे मार्केट, शितोळे नगर, नवी सांगवी, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, बस स्टॉप, डायनासूर गार्डन, सृष्टी चौक, मासुळकर नगर येथे पदयात्रा आणि रॅलीची सांगता झाली. रॅलीत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मतदार तरुणांचा उल्लेखनिय प्रतिसाद मिळू लागल्याने पार्थ पवार यांच्या बाजुने मावळची लहर असल्याचे स्पष्ट होत आहे.