breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही : अजित पवार
पुणे | पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपली भूमिका मांडली.
बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.