Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेकडे मुबलक पाणी ; तरीही क्रीडा विभागाच्या ‘घशाला कोरड’

पाण्यासाठी चक्क क्रीडा विभागाची महापालिकेच्या ‘सारथी’वर तक्रार

पिंपरी –  शहरातील नागरिकाला घरबसल्या महापालिकेच्या कोणत्याही विभागाची तक्रार करता यावी, याकरिता ‘सारथी हेल्पलाईन सेवा’ सुरु करण्यात आली. सारथीवरील तक्रारीची तत्काळ दखल घेवून त्या तक्रारीचे 24 तासाच्या आता निराकरण त्या-त्या विभागाकडून करण्यात येते.  परंतू, एेन उन्हाळ्यात क्रीडा विभागातील कार्यालयात पिण्याचे पाण्यासाठी अधिकारी व कर्मचा-याची गैरसोय होत आहे.  कार्यालयात पाणी नसल्याने पालिकेच्या सारथीचा आधार घेवून क्रीडा विभागाने पिण्याच्या पाण्याची सोय कार्यालयात करावी, अशी मागणी कर्मचा-यानी केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी पालिकेच्याच क्रीडा विभागाला सारथीवर तक्रार करण्याची वेळ आलीय, तर शहरातील नागरिकांची पाण्याकरिता काय अवस्था होत असेल, असा सवाल कर्मचा-यातून विचारला जात आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेचा अडगळीत पडलेला विभाग म्हणजे क्रीडा विभाग आहे. त्या विभागाकडे महापालिका आयुक्तांसह पदाधिका-यांचेही दुर्लक्ष झाले आहे. केवळ महापालिकेच्या विविध स्पर्धांच्या नियोजना व्यतिरिक्त त्या क्रीडा विभागाला कोणी वालीच नाही. सध्या महापालिकेचा क्रीडा विभाग सोयी-सुविधापासून वंचित राहिला आहे. परंतू, पदाधिका-यांसह अधिका-याना विभागातील कर्मचा-यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली जात आहे.

नेहरुनगरच्या आण्णासाहेब मगर स्टेडियम येथून स्थलांतर करुन क्रिडा विभाग कार्यालय मासुळकर काॅलनीतील जून्या डी.वाय.पाटील काॅलेजमधील पालिकेच्या इमारतीत सुरु केले आहे. क्रिडा विभागात प्रशासकीय अधिका-यासह दहा ते पंधरा कर्मचारी काम करीत आहेत. कार्यालय सुरु होवून दीड महिने झाले, तरी अद्याप सोयी-सुविधांचा अभाव आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शाैचालय, स्वच्छतागृह उपलब्ध नाही. पाणी पुरवठा करणारी मोटार नादुरुस्त झाली आहे. पाणी शुध्दीकरणाची अॅक्वागाॅर्ड मशीन नाही. आरोग्य कर्मचा-याकडून कार्यालयाची साफसफाई दररोज होत नाही. सहायक आयुक्त, प्रशासन अधिका-याना प्रशस्त स्वतंत्र दालनाची सोय नाही. कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसविलेली नाही. कार्यालयाची रंगरंगोटी केलेली नाही. प्रशासन अधिका-याना स्वतंत्र वाहनाची सोय नाही.  तसेच पालिकेचे क्रीडा विभाग कार्यालय नेमकं आहे तरी कोठे? याकरिता दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना कार्यालय शोधूनही सापडत नाही. यासह आदीं समस्यांनी क्रीडा विभागाला ग्रासले आहे.

दरम्यान, महापालिका क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून सारथी हेल्पलाईनवर तक्रार दिली आहे. तसेच वारंवार वेगवेगळ्या विभागाकडे समस्या मांडूनही त्या सोडविल्या जात नसल्याची खंत अनेक कर्मचारी बोलून दाखवित आहे. तर एक कर्मचारी म्हणाला की, तब्बल दोन महिने झाले पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृहाचा अभाव असल्याने आमची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. पिण्याचे पाण्याची बाॅटल विकत आणून पाणी प्यावे लागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या समस्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने सर्व कर्मचा-यांनी एकत्रित येवून सारथीवर तक्रार करण्यात आली आहे. त्यांची दखल घेवून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button