Mahaenews

पाण्याच्या टाकीत पडून कामगारांचा मृत्यू

Share On

पिंपरी – पाण्याची टाकी साफ करत असताना विजेचा धक्का बसल्याने पाण्याच्या टाकीत पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिखली घरकुल प्रकल्पात घडली. 

अमर खिलारे (वय 25. रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सिद्धार्थ काळे (वय – 30) हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या मागे आशीर्वाद या नावाने सोसायटी आहे. अमर आणि सिद्धार्थ शुक्रवारी सकाळी सोसायटीतील पाण्याची टाकी मशिनच्या सहाय्याने साफ करत होते. त्यावेळी अचानक विजेचा धक्का अमर आणि सिद्धार्थ या दोघांना बसला. तसेच वीज प्रवाह पाण्यात उतरला. दोघेही टाकीत पडले. त्यात अमर याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सिद्धार्थ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

Exit mobile version