पाणी पुरवठ्यांच्या सहशहर अभियंता पदी आयुबखान पठाण यांच्याकडे पदभार

पिंपरी – महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर नियमित वयोमानानुसार आज (बुधवारी) निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात सह शहर अभियंता अय्युबखान पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, या पदासाठी कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या नावाची चर्चा आहे.
पिंपरी महापालिकेत रविंद्र दुधेकर कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांच्याकडे आता सह शहर अभियंता पदाचा पदभार होता. दुधेकर यांनी महापालिकेत 37 वर्ष सेवा केली आहे. याकाळत त्यांनी स्थापत्य विभागात 20 वर्ष, पाणीपुरवठा विभागात 10 वर्ष, जलनिस्सारण विभागात साडेतीन वर्ष सेवा केली आहे. त्यांना महापालिकेतील कामाचा दांडगा अनुभव होता. नियमित वयोमानानुसार बुधवारी पालिकेतील 71 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात सह शहर अभियंता अय्युबखान पठाण यांच्याकडे देण्यात आला