breaking-newsआंतरराष्टीय
पाकिस्तान विद्यापीठाचा अजब फतवा, तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बाहरिया विद्यापीठाने एक अजब फतवा काढला आहे. तरुण-तरुणींना विद्यालयाच्या आवारात असताना एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेली याबबातची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आदेशावर जोरदार टीका होत आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून या फतव्याचे समर्थन करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या आदेशानुसार, विद्यालयाच्या आवारात असताना तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवावं. नियमाचं पालन न करणाऱ्यांना दंड आकारला जाईल किंवा अनुशासनात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ऑल पाकिस्तान युनिव्हर्सिटीज अॅकेडमिक स्टाफ असोसिएशन फेडरेशनने (FAPUASA) बाहरिया विद्यापीठाला पत्र लिहून आदेश तातडीने परत घेण्यास सांगितलं आहे.