Mahaenews

पाकिस्तानात शेकडो नवजात मुलींचे मृतदेह कचऱ्यात

Share On

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुलींच्या जन्मदराबाबत भारतासह अनेक एशियाई देशांत चिंताजनक स्थिती आहे. आपला शेजारी पाकिस्तानमधील एका घटनेने भीषण वास्तव उघड केले आहे. समाजातील मुलींची विदारक स्थिती समोर मांडली आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये कचऱ्यात शेकडो नवजात अर्भकांचे मृतदेह सापडले आहेत. खुद्द कराची शहरातच 345 नवजात अर्भकांचे मृतदेह कचऱ्यात सापडले असून त्यापैकी 99 टक्के मृतदेह मुलींचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एका अर्भकाचा गळा कापलेला होता, तर एकाचे मस्तक ठेचलेले होते. प्रत्यक्षात नवजात अर्भकांना मशिदीच्या दारात टाकण्यात आले होते. ती अवैध संतती मानून दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानात बालहत्या गुन्हा आहे, मात्र बहुतांश अर्भकांच्या मृत्यूचे कारण विवाहपूर्व संबंधातून झालेला जन्म हे असल्याचे कराचीतील ईदी चॅरिटी सेंटरचे अन्वर काजमी यांनी सांगितले. सामाजिक कलंक समजून विवाहपूर्व संबंधांतून जन्मलेल्या अर्भकांची हत्या केली जाते. मात्र अशा जन्मलेल्या मुलांची हत्या केली जात नाही असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version