breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानला भूकंपाचा हादरा; 9 बालके जखमी

पेशावर – पाकिस्तानच्या वायव्य भागाला आज भूकंपाच्या दोन धक्‍क्‍यांनी हादरवले. त्यात 9 बालके जखमी झाली. रिश्‍टर स्केलवर या धक्‍क्‍यांची तीव्रता 6.4 आणि 5.5 इतकी नोंदली गेली.

प्रामुख्याने पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतात भूकंपाचे दोन्ही धक्के जाणवले. एका भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या बन्नू शहरात जमिनीखाली सुमारे 12 किलोमीटर अंतरावर होता. तर दुसऱ्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकीस्तान सीमेवर 97 किलोमीटर खोलीवर होता.

भूकंपाचे धक्के जाणवलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे घाबरलेल्या बन्नूमधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन मजली इमारतीमधून बाहेर धाव घेतली. काहींनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवरून थेट खाली उड्या घेतल्या. त्यामध्ये नऊ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. भूकंपाचे धक्के प्रामुख्याने पेशावर शहरात आणि स्वात खोऱ्यात जाणवले.

पाकिस्तान हा भूकंपप्रवण देश मानला जातो. मागील महिन्यातही खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील अनेक शहरांना भूकंपाचा हादरा बसला होता. त्याची तीव्रता 5.6 इतकी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button