breaking-newsराष्ट्रिय
पाकिस्तानच्या गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

श्रीनगर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही घटना घडली. सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानी रेंजर्स सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. रविवारी भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय चौक्यांवर तोफगोळयांचा वर्षाव केला.