breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाकिस्तानच्या गोळीबारात परभणीचा जवान शहीद

औरंगाबाद : पाकिस्तानच्या गोळीबारात परभणीच्या अवघ्या २१ वर्षीय जवानाला वीरमरण आले आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी इथं सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शिपाई शुभम सूर्यकांत मुस्तापुरे शहीद झाले आहेत. शुभम यांच्या पार्थिवावर उद्या ५ एप्रिल रोजी सकाळी कोनेरवाडी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावात एका शेतकरी कुटुंबात शुभम मुस्तापुरे यांचा जन्म झाला होता. वर्षभरापूर्वीच ते लष्करात दाखल झाले होते. शुभम यांच्या निधनामुळे कोनेरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. शुभम यांचे पार्थिव खास विमानाने आज रात्री औरंगाबादला पोहोचेल. तेथून ते मोटारीने कोनेरवाडीत पहाटेपर्यंत आणण्यात येईल. ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कोनेरवाडी येथे शुभम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सैन्यदलाने दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. या गोळीबारात शुभम मुस्तापुरे शहीद झाले. यावेळी आणखीही तीन अधिकारी जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button