breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पाकचा कट; शिर कापणारे (BAT) कमांडो तैनात

नवी दिल्ली : नियंत्रण रेषे (LoC)वर हादरवून सोडणारे प्रत्युत्तर भारतीय जवानांनी पाक रेंजर्सना दिल्यानंतर पाक लष्कराने आता नवा कट रचला आहे. पाकने LoC वर बॉर्डर अॅक्शन टीम (BAT)चे कमांडो तैनात केले आहेत. घात घालून भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्यात BAT कुख्यात आहेत. BAT ने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे प्रकर या आधी घडले आहेत.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आतंरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर भारतीय जवानांना लक्ष्य करण्याची रणनीती पाकने बनवली आहे. १७ आणि १८ तारखेला शस्त्रसंधींचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केल्याने पाकचा हा कट उघड झाला. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकचा एक एसएसजी कमांडो मारला गेला. नियंत्रण रेषेवर एवढ्या प्रशिक्षित कमांडोंच्या तैनातीने पाकच्या या कटाचं बिंग फुटलं आहे.