breaking-newsआंतरराष्टीय

पहिली पगडीधारी शीख महिला बनली न्यूयॉर्कची पोलीस अधिकारी

न्यूयॉर्क (अमेरिका) – गुरुसोच कौर या न्यूयॉर्कमधील पहिल्या पगडीधारी महिला पोलीस अधिकारी बनल्या आहेत. त्या पोलीसात भरती झाल्याने इतर शीख महिलांनाही पोलीसात भरती होण्याची प्रेरणा मिळणार आहे आणि लोकांमध्ये शीख धर्माबाबत आधिक जाणीव निर्माण होणार आहे. गुरुसोच कौर या एपीओ (आग्काल्यिरी पोलीस अधिकारी) म्हणून न्यूयॉर्क पोलीस दलात सामील झाल्या आहेत. गेल्या आठवड्यातच त्या न्यूयॉर्क सिटी पोलीस अकादमीमधून पदवीधर झाल्या आहेत.

पहिल्या शीख पगडीधारी महिला आग्काल्यिरी पोलीस अधिकाऱ्याचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचे स्वागत करताना आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे, असे शीख पोलीस अधिकारी असोसिएशनने ट्विट केले आहे. आपण पोलीस दलात भरती झाल्याने इतरांनाही पोलीस दलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल असे असोसिएशनने फेसबुकवर पोस्ट केले आहे. पगडीधारी महिला पोलीस अधिकारी अमेरिकेत शीख धर्माबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचे काम करील. शीख धर्म आणि शीख व्यक्ती यांच्याबाबत लोकांमध्ये अधिक जाणीव निर्माण करीला, असे भारतातील निवास आणि शहरी व्यवहार राज्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्‌विट केले आहे. या पूर्वी शीख व्यक्तींबाबत, यात माझाही समावेश आहे, आणि कॅनडाचे मंत्री नवदीप बन्स यांच्याबाबत जशा घटना घडल्या होत्या, तशा पुन्हा घडणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. सन 2010 मध्ये त्यांना ह्यूस्टन विमानळावर आणि अलीकडे नवदीप बन्स यांना डॅट्रॉईट मेट्रो विमानतळावर पगडी काढण्यास सांगण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button