breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवार साहेबांची ‘पॉवर’, तासाभरात उभारला 5 कोटींचा निधी

सातारा :   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी अवघ्या तासाभरात पाच कोटींचा निधी मिळवून दिला. गेल्या वर्षीही त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावांना खासदार फंडातील एक कोटींचा निधी दिला होता.सातारा जिल्हा सहकारी बँक, जिल्हा परिषद, पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांनी पवार साहेबांच्या शब्दावर माण- टावच्या लोकसहभागातील जलसंधारणासाठी निधी देण्याचे जाहीर केले. आज वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेट देताना जलसंधारणाच्या कामांसाठी सरकारवर अवलंबून न रहाता मदत करण्याची ग्वाही दिली.

जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना फोन करुन बॅंकेतर्फे या कामासाठी मदत करण्याविषयी सांगितले. शिवेंद्र बाबांनीही तात्काळ एक कोटींची मदत करण्याची तयारी दाखविली. जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही पवार साहेबांच्या सुचनेवर दीड कोटींचा निधी जलसंधारणासाठी देणार असल्याचे सांगितले. गाडीत बसल्याबसल्या शरद पवार यांनी पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांना फोनवरुन दुष्काळी माण, खटावमधे सुरु असणाऱ्या जलसंधारण कामांना मदत करण्याची विनंती केली. त्या संस्थांनीही तात्काळ दोन ते अडिच कोटींची मदत करण्याचे मान्य केले.

शरद पवार यांनी गाडीत बसून तासाभरातच पाच कोटींचा निधी उभा करुन खऱ्या अर्थाने हजारो श्रमदात्यांचा उत्साह वाढविला. त्यांच्या शब्दाला किती मोठी किंमत आहे याची प्रचिती माण, खटावच्या जनतेला आली. श्रमदानातून राज्यात आदर्शवत ठरेल असे जलसंधारणाचे काम करुन दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच असे सांगून त्यांनी जनतेला धीरही दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button