ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात बुडालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात शिवदूर्ग टीमला यश

पिंपरी :  पवना धरणात काल (रविवार) बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने हे शोधकार्य केले. दोन्ही मृतदेह आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सापडले.

जितेश पगार (वय 19, नाशिक), अनिकेत निकम (वय 20, साक्री, धुळे), अशी पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात ब्राम्हणोली गावच्या हद्दीत पवना धरणावर जितेश व अनिकेत दोघेही आपल्या अन्य चार मित्रांसमवेत पवना धरणावर काल (रविवार) सायंकाळी फिरायला आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यात पोहताना व खेळताना जितेश व अनिकेत पाण्यात बुडाले असल्याचे समजले.

विद्यार्थी बुडाल्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह लोणावळा ग्रामीणचे पोलीस व शिवदुर्ग या रेस्क्यू टीमने धरण परिसरात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.  दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अखेर दोघांचेही मृतदेह सापडले.

शिवदूर्गच्या अजय शेलार, प्रवीण देशमुख, विकास मावकर, अमोल परचंड, राजू पाटील, नागेश इंगुळकर, दिनेश पवार, विशाल शेलार, सागर कुंभार, अजय राऊत, आनंद गावडे, महिपती मानकर, महेश मसने, प्रशांत  इकारी, हनुमंत भोसले, हरिश्चंद्र गुंड, सुनील गायकवाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर्व टीमचे आभार मानन्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button