breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना, आंद्रा, भामा-आसखेड धरणाचे पाणी आणण्याचे नियोजन करा – आमदार महेश लांडगे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता भविष्यात पाणी पुरवठा कमी पडणार आहे. त्यामुळे आताच पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाण्याचे आरक्षण मिळवून तेथील पाणी आणण्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.

आमदार महेश लांडगे यांनी पाणी आरक्षणाबाबत बैठक घेतली.  या बैठकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य अभियंता जलसंपदा व सहसचिव संजय वेबसरे, माजी जलसंपदा मंत्री अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. शहराची भविष्यातील तहान भागविण्यासाठी आत्ताच ठोस उपाय योजना करायला हवी. त्यासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत मांडली.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, डुडुळगाव, च-होली या भाग इंद्रायणी नदीच्या खो-यात येतो.  या भागातील भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षण करणे आवश्यक आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना कुठल्याही पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागू नये, यासाठी ही मागणी करण्यात येत आहे. पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button