breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
परिवहन सेवांचा २६ जूनला राज्यव्यापी संप

मुंबई : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये केलेल्या नवीन बदलांचा परिणाम देशभरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवर होणार आहे. त्या निषेधार्थ २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालक, एसटी कर्मचारी, पालिकांच्या परिवहन सेवेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
केंद्राकडून मोटार वाहन कायद्यात नवीन बदल केले जात आहेत. त्याचा परिणाम परिवहन व्यवस्थेवर होत असल्याने त्यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी नुकत्याच परिवहन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचा मेळावा परळ येथे भरवण्यात आला होता. यावेळी वाहन कायद्यातील प्रस्तावित बदलांविषयी चर्चा करण्यात आली. त्यातून परिवहन सेवा, कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेत या धोरणांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.