breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘पबजी’ खेळतो म्हणून आई रागावल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ऑनलाईन मोबाईल गेम्समध्ये सध्या तरुणांवर गारुड केलेल्या पबजीने आणखीन एक बळी घेतला आहे. सातत्याने मोबाईलवर हा गेम खेळत असल्यामुळे आई रागावल्याने एका दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना तेलंगणात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडचाळ-मलकजगिरी जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडली. मलकजगिरीचे पोलीस उपनिरिक्षक के. संजीव रेड्डी यांनी सांगितले, कल्लागुरी सम्बाशिवा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची सध्या दहावीची परिक्षा सुरु असतानाही तो सातत्याने मोबाईलवर गेम खेळत होता. अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याने गेम खेळू नये यासाठी त्याची आई त्याला ओरडली. मात्र, त्यानंतर चिडलेल्या सम्बाशिवाने स्वतः आपल्या बेडरुममध्ये कोंडून घेतले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘पबजी’ किंवा ‘प्लेअर्स अननोन बॅटलग्राऊंड’ हा ऑनलाइन मल्टिप्लेअर गेम आहे. यामध्ये एकाच वेळी सुमारे १०० प्लेअर्स गेम जिंकण्यासाठी लढाईचा खेळ खेळू शकतात. ही गेम सध्या भारतात आणि परदेशातही खूपच प्रसिद्ध झाली आहे. टेन्सन्ट कॉर्पोरेशन या कंपनीने हा गेम बनवला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात २०० दशलक्ष वेळा हा गेम डाऊनलोड करण्यात आला आहे. तर जवळपास ३० दशलक्ष लोक दररोज हा गेम खेळतात.

या गेमचे तरुणांमध्ये एक प्रकारे व्यसन जडले आहे. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भारतातील विविध भागातून होत आहे. दरम्यान, गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात या गेमवर बंदीही घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button