breaking-newsपुणे
पत्नीचे होते २ जणांशी अनैतिक संबंध, तिला रोखण्यासाठी त्याने उचलले हे पाऊल

पुणे- पत्नीला वारंवार समजावून सांगितल्यानंतरही ती अनैतिक संबंध ठेवत असल्याने एकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना नऱ्हे येथे घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आता सिंहगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण हा इलेक्ट्रीकल डिप्लोमा केल्यानंतर नोकरी करत होता. प्रवीण आणि आरोपी महिलेचा 2006 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 11 वर्षांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर 2014 पासून ती नितीन आणि गणेश यांच्याबरोबर बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पत्नीचे त्यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रवीणला मिळाली.
प्रवीणने पत्नीला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रवीण तसेच त्यांच्या नातेवाईकांनीदेखील 03 जूलै रोजी तिला समजावून सांगितले. त्यावेळी त्यांच्याशी बोलणार नाही. असे तिने सांगितले. परंतू तिने पुन्हा त्यांच्याशी बोलणे सुरुच ठेवले. यातूनच नैराश्य आल्याने प्रवीण याने 17 जुलै रोजी राहत्या घरात दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र प्रवीणच्या आत्महत्येनंतर तिघेही फरार झाले असून सिंहगड पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.