Uncategorized

पंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकलं आहे. मोदींचे इन्स्टाग्रामवर सध्या ६८ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत तर ट्रम्प यांचे ६३ लाख फॉलोअर्स आहेत. मागच्या वर्षी मोदी हे याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. मागच्या वर्षभरात मोदींनी इन्स्टाग्रामवर ५३ फोटो टाकले आहेत. यातला प्रत्येक फोटो जवळपास २ लाख २३ हजार लोकांनी पाहिला तर प्रत्येक फोटोला जवळपास १ लाख ४१ हजार लोकांनी लाईक आणि कमेंट केली. इन्स्टाग्रामवरच्या फॉलोअर्सच्या यादीमध्ये पोप फ्रान्सिस तिसऱ्या, व्हाईट हाऊस चौथ्या क्रमांकावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button