breaking-newsआंतरराष्टीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे माजी पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी येथे महात्मा गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण केले. या क्लिफोर्ड पियर किनाऱ्यावर १९४८ मध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन ज्या ठिकाणी करण्यात आले होते. आपला तीन दिवसांचा दौरा आटोपूना मोदी भारतात दाखल झाले.

मोदी यांनी व्टिट केले की, बापूंचे विचार आणि आदर्श आम्हाला मानवतेसाठी अधिक काम करण्याची पे्ररणा देतात. महात्मा गांधींचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो तेने कहिए’ आणि ‘रघुपती राघव राजा राम सादर करण्यात आले. त्यांनी चांगी नौदलाच्या तळावर पाहणी केली. यावेळी संरक्षणमंत्री मोहम्मद मलिकी उस्मान उपस्थित होते. मोदी यांनी नौदलाचे अधिकारी व कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यांनी तेथील तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

मोदी यांनी येथे चाइना टाउनमधील हिंदू व बौद्ध मंदिरांला भेट दिली. मोदी यांनी येथील मरिअम्मा मंदिरात पूजा केली. मोदी यांनी व्टिट केले की, सिंगापूरच्या सुंदर मंदिरात प्रार्थना करून समाधान वाटले. मोदी यांनी चूलिया मशिदीलाही भेट दिली. मुस्लीम व्यापाºयांनी ही मशीद १८२६ मध्ये उभारली होती. त्यांनी येथील इंडियन हेरिटेज सेंटरमधून रुपे कार्डद्वारे एक मधुबनी पेंटिंगची खरेदी केले. मधुबनी पेंटिंग (मिथिला कला) भारत व नेपाळच्या मिथिला भागात प्रचलित आहे.

येथील नॅशनल आॅर्किड गार्डनमध्ये मोदींच्या भेटीनिमित्ताने एका आॅर्किडचे (फुलझाड) नाव मोदींच्या नावाने ठेवण्यात आले. गार्डनमध्ये एका फुलझाडाचे नाव देंड्रोब्रियम नरेंद्र मोदी ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीला भेट दिली. यावेळी युनिव्हर्सिटी आणि भारतातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य तसेच औद्योगिक भागीदारीसंबंधी एकूण सहा करारांवर स्वाक्षºया करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button