breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंतप्रधान आवास योजनेत घर देणार असल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल ; सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

पिंपरी –  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नागरिकांकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देतो, असे सांगून अर्ज भरुन घेतले. परंतु, ही योजना केंद्र आणि राज्य सरकारमार्फत असताना या नगरसेवकांनी मतासाठी पालिका राबविणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे. तसेच दिशाभूल करणा-या अधिकारी, नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु, या योजनेअंतर्गत घरे देण्याचे काही निकष आहेत. परंतु, ते निकष गोरगरीब नागरिकांना न सांगता त्यांना महापालिका निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारांनी घरे देण्याचे आमिष दाखविले. त्यांची मते घेऊन निवडून आले. या नगरसेवकांनी एक प्रकारे ही गोरगरिबांची फसवणूक केली आहे.

पंतप्रधान आवास योजना केंद्र, राज्य आणि महापालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे. परंतु, महापालिका योजना राबविणार असल्याचे सांगून भाजपच्या नेत्यांनी अर्ज भरुन घेतले आहेत. खोटे सांगून सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही परचंडराव यांनी केली आहे. तसेच गृहप्रकल्पासाठी लागणारी जागा ताब्यात नसताना सर्व्हे कसा करण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button