breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

पंजाबच्या सीमेवर दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक

सीमा सुरक्षा दलांनी पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी चलन, दोन मोबाइल, दोन सिम कार्ड हे देखील जप्त करण्यात आलं आहे. हे दोघेही भारतात घुसखोरी करण्याच्या बेतात होते त्याचवेळी सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Punjab: Operation party of Border Out Post Dona Telu Mal apprehended 2 Pakistani nationals in Firozpur who were approaching to the Indian side around 5.10 pm earlier today. 2 IDs of Pakistan Army, cash, 1 Pakistani SIM card, 4 photographs and 2 mobile phones seized from them.

सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते त्याचवेळी हे दोघे जण भारतात घुसखोरी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. आता या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. हे दोघे नेमक्या कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन त्यांनी का आणले होते याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button