नोव्हेल ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

पिंपरी – चिंचवड येथील नोव्हेल ज्यूनियर कॉलेजचा २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षातील बारावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
विज्ञान शाखेमध्ये शंकर क्रीष्णागौडार, सिद्धेश डुंबरे आणि रोहित बनकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेमध्ये फिलीप क्रीश, श्रेया देशपांडे आणि श्रुती पांचाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. नोव्हेल ज्यूनियर कॉलेजचे विद्यार्थी व त्यांचे पालक कॉलेजच्या १०० टक्के निकालाबाबत अतिशय आनंदी आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक व प्राचार्य यांचे आभार मानले.
नोव्हेल ग्रूप ऑफ इंन्स्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे यांनी मुलांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.