breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नोटाबंदीनंतर ‘क्लीन मनी’ कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.

ऑपरेशन ‘क्लीन मनी’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आजपासून ऑपरेशन ‘क्लीन मनी’चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यात 60 हजार नागरिकांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी होणार आहे.

या 60 हजार नागरिकांपैकी तेराशे खाती जोखमीची असल्याचे आयकर विभागानं म्हटले आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीच्या काळातले 6 हजार मालमत्ता व्यवहार आयकर विभागाच्या चौकाशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत.ऑपरेशन ‘क्लिन मनी’च्या पहिल्या टप्प्यातील कारवाई 31 जानेवारीला पार पडली. या कारवाईदरम्यान आयकर विभागाने एकूण 17.92 लाख लोकांची चौकशी केली. यामधील 9.46 लाख लोकांची चौकशी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button