breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नोकरीच्या आमिषाने एकाची फसवणुक

पुणे । प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केली गेली आहे. ही घटना १३ नोव्हेंबर २०२० ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये मांजरी-बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत एका ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या भावास पुणे महानगरपालिकेत, अतिक्रमण विभागामध्ये सहा. अधिकारी या पदावर नोकरीला लावतो, असे खोटे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वरील कालावधीमध्ये वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. परंतु त्यांच्या भावास नोकरीस न लावता त्यांची फसवणूक केली. म्हणून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पो. उप निरीक्षक एस. एस. गाडेकर करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button