नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही भव्य पुतळा उभारण्याची मागणी

स्वातंत्र्य सैनिक आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारा अशी मागणी आता त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. ३१ ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा आहे. हा पुतळा जगातल्या उंच पुतळ्यांपैकी सर्वात उंच पुतळा आहे. यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला जावा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारी या पुतळ्याची आणि त्यांच्या स्मारकाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांनी या संदर्भातली मागणी केली आहे. चंद्रकुमार बोस यांनी या संदर्भातले ट्विट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे. दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुँगा’ असा नारा देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान खूप मोठे आहे. त्यांचा याच योगदानाचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भातली घोषणा करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीत उभारला जावा ही मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. आझाद हिंद सेनेच्या माजी सैनिकांचीही ही इच्छा आहे. आता आम्ही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी २३ जानेवारीला या पुतळ्यासंदर्भातली घोषणा करावी अशीही मागणी आम्ही केली आहे, असेही चंद्रकुमार बोस यांनी स्पष्ट केले.