breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नीति आयोगाचे सीईओ म्हणाले- बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांमुळे देश मागास

नवी दिल्ली – नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी म्हटले आहे, की दक्षिण आणि पश्चिमी राज्यांचा वेगाने विकास होता आहे. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान सारख्या राज्यांमुळे देश मागास होत असल्याचे ते म्हणाले. कांत यांनी या राज्यांतील शिक्षणाची खालावलेली स्थिती आणि वाढत्या बालमृत्यूवरही चिंता व्यक्त केली. अमिताभ कांत हे सोमवारी जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या पहिल्या अब्दुल गफ्फार खान स्मारक व्याख्यानात बोलत होते.

ज्या राज्यांमुळे विकासावर परिणाम तिथे एनडीए सत्तेत

राज्य केव्हापासून एनडीए सरकार?
बिहार ऑगस्ट 2017
उत्तर प्रदेश मार्च 2017
मध्य प्रदेश नोव्हेंबर 2005
छत्तीसगढ डिसेंबर 2003
राजस्थान डिसेंबर 2013

मानव विकास निर्देशांकात अजूनही मागे
– चॅलेंजेस ऑफ ट्रान्सफार्मिंग इंडिया विषयावर बोलताना अमिताभ कांत म्हणाले, देशात व्यापार करण्यात वाढ झाली आहे. मात्र मानव विकास निर्देशांकात जगाच्या पातळीवर आपण अद्यापही मागे आहोत. जगातील 188 देशांत भारताचा क्रमांक 133वा आहे.
– ते म्हणाले, मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी आपल्याला सामाजिक संकेतांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्याला मातृभाषेतही वाचता येत नाही
– अमिताभ कांत यांनी ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवले. ते म्हणाले, ‘आमचा शैक्षणिक स्तर अतिशय वाईट आहे. पाचवीतील मुलाला दुसरीच्या वर्गातील प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. चौथी-पाचवीतील मुलांना मातृभाषाही वाचता येत नाही. बाल मृत्यूदरही वाढत आहे. जोपर्यंत आपण हे सर्व अडथळे पार करत नाही तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही.’

निर्णय प्रक्रियेत महिलांचाही समावेश असला पाहिजे
– अमिताभ कांत म्हणाले, निर्णय प्रक्रियेत महिलांचाही समावेश असला पाहिजे. हे निश्चित करण्यासाठी ठराविक योजना असली पाहिजे.

दक्षिणीतील राज्यांचे कौतूक
– अमिताभ कांत म्हणाले, देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे आव्हान हे दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्य चांगल्यापद्धतीने पार पाडत आहेत. त्यांचा विकासदरही चांगला असून तिथे झपाट्याने विकास होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button