breaking-newsमहाराष्ट्र

निर्देशांक तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

धातू, ऊर्जा, रिऍल्टी व बॅंकिंग क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअरची खरेदी 
मुंबई – जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असले तरी भारतीय शेअरबाजारात मात्र सोमवारी जोरदार खरेदी झाली. धातू, ऊर्जा, रिऍल्टी, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची आज मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे निर्देशांक तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 292 अंकानी वाढून 35208 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 97 अंकांनी वाढून 10715 अंकांवर बंद झाला. 1 फेब्रुवारीनंतर निर्देशांक प्रथमच या पातळीवर आले आहेत. गेल्या दोन दिवसात मात्र सेन्सेक्‍स 261 अंकांनी कमी झाला होता.

देशातील संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय कंपन्याची उत्पादकता वाढणार असल्याचे वाटत आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांकडून जास्त खरेदी केली जात असल्याचे वातावरण बाजारात आहे. या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1084 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1628 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याचे शेअरबाजारांनी सांगितले.

रोजगार जास्त प्रमाणात न वाढल्यामुळे अमेरिका इतक्‍यात व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता कमी झाल्यामुळे अमेरिकन शेअरबाजार निर्देशांक वाढले तरी आशियायी आणि युरोपियन शेअरबाजार निर्देशांक मात्र वाढले नाहीत.
आगामी काळात वाढणारे क्रूडचे दर हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय राहणार आहे. आता क्रूडचे दर 75 डॉलरच्या पुढे गेले आहेत, ओपीईसी देशांनी क्रूडचे दर आणखी वाढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर जागतिक घडामोडीमुळे रूपयांचे मूल्य वेगाने कमी हाते आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय असणार असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. बाजारात असलेल्या सकारात्मक वातावरणाचा छोट्या कंपन्यांनाही लाभ झाला. त्यामुळे स्मॉल कॅप 0.56 टक्‍क्‍यांनी तर मिडकॅप 0.55 टक्‍क्‍यांनी वाढले. आज इतर क्षेत्रातील निर्देशांक वाढले असतानाच रुपया घसरल्यामुळे आरोग्य क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकात अनुक्रमे 0.53 टक्के आणि 0.01 टक्‍क्‍यांची घट झाली असल्याचे दिसून आले.

अमेरिकेतील व्याजदर वाढीला उशीर लागणार असल्यामुळे अमेरिकेतील शेअरबाजार निर्देशांक वाढले. त्याचबरोबर भारतातील काही मोठ्या कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे शेअरबाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक वाढले. गुंतवणूकदारांनी घसरलेला रुपया आणि वाढत असलेल्या क्रूडच्या किमतीकडे दुर्लक्ष केले.
– आनंद जेम्स, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीस सेवा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button