breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : पर्रीकर

पणजी : अतिवेगाने वाहन चालविणार्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांवर कडक कारवाई करावी अशी सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.
बुधवार दि. 19 पासून राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सुरक्षीतपणे वाहने चालवावीत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी जनतेला केली आहे. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वाहतूक पोलिस अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अशी सूचना वाहतूक पोलिसांना केली आहे.