निपाह विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 13

कोझिकोड – निपाह विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केरळमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 13 झाली आहे. पालाझी जिल्ह्यामध्ये 26 वर्षीय युवकाचा आज खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका ज्येष्ठ महिलेचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान काल मृत्यू झाला.
पेरांब्रा येथे गेल्या आठवड्यात निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 16 रुग्णांना त्याची लागण झाल्याचे चाचणीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तपशील गोळा करण्यात आले असून त्या सर्वांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, असे केरळचे आरोग्यमंत्री के.के. श्यालजा यांनी यांनी सांगितले. पर्यटकांपैकी कोणामध्ये या विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसल्यास त्यांना त्वरित इतरांपासून वेगळे करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे पर्यटन मंत्री कदाकामपल्ली सुरेंद्रन यांनी दिली आहे.