breaking-newsताज्या घडामोडीपुणे

निगडीतून महिलांसाठी “तेजस्विनी’ स्वतंत्र बस सुविधा

  •  महापौर काळजे यांच्या हस्ते उद्‌घाटन

पिंपरी – “पीएमपीएमएल’ प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याची सुरूवात इंद्रायणीनगरमधून करण्यात आली आहे. त्यांच्या या निर्णयाचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मी स्वागत करतो. पिंपरी-चिंचवडकर या नात्याने पीएमपीएमएलच्या बसनेच प्रवास करीन आणि त्यासाठी समाजात जनजागृती करेन, अशी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यायला हवी, असे मत महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी (दि. 13) व्यक्त केले.
पीएमपीएमएलच्या वतीने इंद्रायणीनगर येथील सेक्‍टर क्रमांक 13 ते पुणे स्टेशन या मार्गावर प्रथमच बस सुरू करण्यात आली. तसेच, निगडीपासून महिलांसाठी गुरुवारपासून “तेजस्विनी’ ही स्वतंत्र बस धावायला सुरूवात झाली. या दोन्ही उपक्रमाचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महौपर बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका गीता आफळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, महिला बालकल्याण सभापती सुनिता तापकीर, विधी समिती सभापती शारदा सोनावणे, नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंधे, कोमल घोलप, माजी नगरसेवक भीमा बोबडे, शिक्षणमंडळाचे माजी सभापती चेतन घुले, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, नागरिक व पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर सर्वांनी तिकीट काढून पीएमपीएमएलच्या बसने प्रवास केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button