breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प 17 हजार दिव्यांनी उजळणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे दीपावली पाडवा सणानिमित्त निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहा वाजता या उत्सवाचे आयोजन केले आहे.
यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, किरण चोपडा, महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी 15 हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. विद्युत रोषणाई, उडते आकाशदिवे, फटाक्यांची आतषबाजी, भव्य रांगोळी हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यंदाचे दीपोत्सवाचे हे 17 वे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पवळे, नगरसेविका सुमन पवळे, युवा कार्यकर्ते संतोष कवडे यांनी केले आहे.