breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पिंपरी – शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृह, नालेसफाई, प्लास्टिक बंदी, या प्रलंबित कामांचा आढावा पालिकेच्या आरोग्याच्या विभागाकडून घेण्यात आला. तसेच नालेसफाईत हलगजीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पालिका प्रशासनाने असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेतील आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील दैनंदिनपणे उचलला जाणारा ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, शौचालये, स्वच्छतागृहांचे बांधकाम, अनुदान वाटप, दैनंदिन स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, नालेसफाई, पावसाळी कामे आणि प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्यात आला.

अतिरक्त आयुक्त गावडे म्हणाले, हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील विविध भागातील झोपडपट्टी परिसरात वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी दहा हजार पाचशे लाभार्थींना स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. तसेच दीड हजार स्वच्छतागृहे तयार करण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button