breaking-newsमनोरंजन

नालासोपाऱ्याच्या ‘द किंग्ज’ डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका

मुंबईच्या रस्त्यांपासून सुरू झालेला ‘द किंग्ज’ या हिपहॉप डान्स ग्रुपचा प्रवास अखेर यशस्वी ठरला आहे. या डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका वाजला आहे. ‘द किंग्ज’ने अमेरिकन रिअॅलिटी शो ‘वर्ल्ड ऑफ डान्स’चं विजेतेपद पटकावलं आहे. ‘वर्ल्ड ऑफ डान्स’च्या चषकासह ‘द किंग’ने एक मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे सात कोटी रुपयांची रक्कमही जिंकली आहे.

नालासोपाराच्या या १४ जणांच्या ग्रुपने जबरदस्त परफॉर्मन्स करत परीक्षकांचं मन जिंकलं. अमेरिकेत रविवारी झालेल्या वर्ल्ड ऑफ डान्स शोच्या फिनालेमध्ये कॅनेडियन कन्टेम्पररी डान्सर ब्रायर नोलेट, एली आणि एव्हा या बहिणींची जोडी, व्हीपीप्ज, फिलिपाइन्सचा हिप हॉप ग्रुप, युनिटी एलए, दक्षिण कॅलिफोर्नियातील दहा जणांच्या ग्रुपचा सहभाग होता. जेनिफर लोपेज, नया आणि डेरेक ह्यूग हे वर्ल्ड ऑफ डान्सचे परीक्षक होते. त्यांनी ‘द किंग्ज’ला पूर्ण गुण दिले.

‘द किंग्ज’ हा ग्रुप २००८ साली सुरेश मुकुंद याने बनवला. २०११ मध्ये ‘इंडियाज गॉट टॅलेंट ३’ या रिअॅलिटी शोचं विजेतेपद या ग्रुपने पटकावलं आणि तेव्हापासूनच हा ग्रुप चर्चेत आला. तर २०१५ मध्ये ‘हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप’मध्ये टॉप ३ मध्ये जागा मिळवली होती. ‘द किंग्ज’ या ग्रुपमधील डान्सरचं वय १७ वर्षांपासून २७ वर्षांपर्यंत आहे. तीन महिने सुरू असलेल्या या शोमध्ये ‘द किंग्ज’ने आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे परीक्षक आणि चाहत्यांची मनं जिंकली.

‘द किंग्ज’ने ‘वर्ल्ड ऑफ डान्स’चं विजेतेपद पटकावल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button