breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना दररोज व नियमित पाणी पुरवठा करा, शहर काँग्रेसची मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुर्ण भरले आहे. या पुर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी नागरीकांना जाणून बुजून वेठीस धरण्यासाठी शहरात दिवसाआड वेळी अवेळी पाणी पुरवठा सुरु केला. नविन आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन नियमितपणे पुर्णक्षमतेने पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

सोमवारी (दि. 22 फेब्रुवारी 2021) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना भेटून पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शहर सेवादलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, कबीर व्ही.एम, सतीश भोसले, पिंपरी चिंचवड युवक कॉग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, पिंपरी युवक कॉंग्रेसचे विधानसभा सरचिटणीस विवेक भाट आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी पवना नदीमधून रावेत येथील बंधा-यातून पाणी घेतले जाते. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असतानाही तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा अधिका-यांनी हिन दर्जाचे राजकारण करुन नागरिकांना वेठीस धरले आहे. दिवसाआड पाणी देऊन वेळी अवेळी पाणी पुरवठा केला जातो. मनपा भवन ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात खराळवाडी, गांधीनगर परिसरात तर मध्यरात्री दोन वाजता तासभर पाणी सोडले जाते. अशीच परिस्थिती सर्व शहरात आहे. त्यामुळे महिला भगिनींचे कामाचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

कोरोना महामारीमुळे प्रशासन वारंवार हात धुण्याच्या सुचना करते परंतू दाट लोकवस्ती परिसरात, झोपडपट्टी परिसरात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे हे शक्य होत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन नवनियुक्त आयुक्तांनी शहरातील सर्व परिसरात दररोज नियमितपणे पुर्ण दाबाने पाणी पुरवठा देण्याबाबत आदेश द्यावेत आणि शहरातील लाखो नागरिकांना प्रशासनाने वेठीस धरले आहे त्यातून त्यांची सुटका करावी अशी मागणी सचिन साठे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button