breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
नागपूरमध्ये होणार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : पुढील महिन्यात सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. आतापर्यंत तीन वेळा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले असून, चौथ्यांदा उपराजधानीत अधिवेशन होत आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलैपासून नागपूरमध्ये सुरू होईल, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढला आहे.
राज्यपालांच्या आदेशाने पावसाळी अधिवेशन मुंबई की नागपूर हा संभ्रम दूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची कल्पना सरकारच्या वतीने मांडण्यात आली होती. पण पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास होणारा विरोध लक्षात घेता सत्ताधाऱ्यांनी निर्णय जाहीर करण्याचे टाळले होते.