breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
नवी मुंबईत झोपड्यांवर कारवाई; जमावाची दगडफेक

नवी मुंबई: कोपरखैरणे येथे बालाजी मल्टिप्लेक्ससमोर सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा झोपड्यांवर कारवाई केल्यानं संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केली. यात कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेकायदा झोपड्यांवर कारवाई आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळं परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोनं तूर्तास कारवाई स्थगित केली आहे. पावसाळा तोंडावर आल्यावर सिडकोनं झोपड्यांवर कारवाई सुरू केल्यानं झोपडीधारक आक्रमक झाल्याचे समजते.