breaking-newsराष्ट्रिय
नवी दिल्लीमध्ये 25 मे पासून आसियान भारत चित्रपट महोत्सव

नवी दिल्ली – नवी दिल्लीतील सिरीफोर्ट सभागृहात आसियान भारत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते येत्या 25 मे रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होईल. आसियान देशांमधील चित्रपट उद्योगातील कलाकार आणि सर्व संबंधितांना चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य वाढविता यावे, यादृष्टीने हा महोत्सव एक आदर्श मंच उपलब्ध करुन देईल.
या महोत्सवात 11 देशांमधले 32 चित्रपट प्रदर्शित केले जातील. चित्रपट प्रदर्शनाबरोबरच चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध मुद्यांबाबत चर्चा करण्यासाठी चर्चा सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. हा महोत्सव 30 मे पर्यंत चालणार आहे.