Views:
166
लाहोर- पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) आणि लाहोर हायकोर्ट बार असोशिएशनने (LHCBA) पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल्टीमेटम दिला आहे. शरीफ यांनी पुढील 7 दिवसांत अर्थात 27 मेपर्यंत राजीनामा द्यावा, अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशाराही वकिलांनी दिला आहे.
दोन्ही बार असोसिएशनने शनिवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी शरीफ यांना वकिलांनी हा इशारा दिला आहे.
असोसिएशन मेंबर्स आणि नवाझ समर्थक वकीलांमध्ये झटापट…
– न्यूज एजन्सी एएनआयनुसार, पनामा पेपर्स लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेशाच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी जास्त काळ पंतप्रधानपदावर राहू नये, असेही दोन्ही बार असोसिएशनच्या मेबर्सनी म्हटले आहे.
– न्यूजपेपर ‘डॉन’च्या रिपोर्टनुसार, दोन्ही असोसिएशनचे मेंबर्स आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) सरकारच्या समर्थक वकीलांमध्ये झालेल्या झटपटीनंतर या मागणीने जोर धरला आहे. 9 मे रोजी ऑल पाकिस्तान लॉयर्स रिप्रेझेंटेटिव्ह्स कन्व्हेशनदरम्यान वकिलांमध्ये झटापट झाली होती.
Like this:
Like Loading...