breaking-newsपुणे

नर्मदेच्या पाण्याने अंघोळ घाला, मंडलेश्वर येथे अंत्यसंस्कार करा – युवकाची चिट्ठी लिहून आत्महत्या

नर्मदेच्या पाण्याने मला अखेरची अंघोळ घाला आणि नर्मदेच्या तीरावर असलेल्या मंडलेश्वर येथे माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे लिहून युवकाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सोमवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास घडली.
जतीन धनंजय जहागीरदार (वय 34, रा. चिंचवडगाव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन यांनी चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्चीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इमारतीबाहेर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. जतीन यांनी आपल्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. घरच्यांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसेच माझा माझ्या दुचाकीमध्ये जीव आहे. त्यामुळे ती विकू नये. अशी शेवटची इच्छा असल्याचे लिहून ठेवले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button