नर्गिसची भूमिका म्हणजे सन्मान – मनिषा कोईराला
संजय दत्तच्या जीवनावरील “संजू’मध्ये नर्गिस दत्तची भूमिका साकारण्याची संधी मिळणे म्हणजे आपल्यासाठी एक मोठा सन्मानच आहे, असे प्रांजळ मत अभिनेत्री मनिषा कोईरालाने व्यक्त केले आहे. मुंबईमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मनिषा उपस्थित होती. त्यावेळी नर्गिस दत्तच्या रोलबाबत बोलताना तिने आपल्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.
“संजू’ फिल्ममध्ये नर्गिस दत्तच्या रोलसाठी विचारले गेले तेंव्हाच आपला मोठा सन्मान होत असल्याचे भाव मनात आले होते. हा रोल कोणत्याही अभिनेत्रीसाठी एक ड्रीम रोल आहे. प्रत्यक्ष्यात “संजू’ फिल्ममध्ये मनिषाचा रोल अगदी पाहुण्या कलाकारासारखा खूपच छोटा आहे. कारण संपूर्ण सिनेमा संजूभोवतीच फिरतो आहे. मात्र तरिइही आपल्या रोलला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे मनिषाने सांगितले. या सिनेमाचे नाव काय ठेवायचे हे आगोदर निश्चित झालेले नव्हते.
संपूर्ण शुटिंग संपेपर्यंत या सिनेमाला संजय दत्तवरील बायोपिक असेच संबोधले जात होते. संजय दत्तच्या जीवनातील सर्व उतार चढावांचे दर्शन राजकुमार हिरानीच्या दिग्दर्शनाखाली आणि विधू विनोद चोप्रांच्या निर्मितीतील या सिनेमामध्ये बघायला मिळेल.