नरेंद्र मोदी हे जर जन्मतः ओबीसी असते तर आरएसएसने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?”

नवी दिल्ली – “पंतप्रधान मोदी हे मुद्दामहून स्वतःला ओबीसी म्हणवून घेत याचा राजकीय फायदा करून घेत आहेत. नरेंद्र मोदी हे जर जन्मतः ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?”, असा बोचरा सवाल उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. “पंतप्रधान मोदींकडे आता अन्य काही असल्याने आता त्यांनी महागठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हे हास्यास्पद आहे”, असेही मायावती म्हणाल्या. मायावती यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
पीएम श्री मोदी ने अब और कुछ नहीं तो गठबंधन पर जातिवादी होने का जो आरोप लगाया है वह हास्यास्पद व अपरिपक्व है। जातिवाद के अभिशाप से पीड़ित लोग जातिवादी कैसे हो सकते हैं? श्री मोदी जन्म से ओबीसी नहीं हैं इसीलिए उन्होंने जातिवाद का दंश नहीं झेला है और ऐसी मिथ्या बातें करते हैं।
— Mayawati (@Mayawati) May 10, 2019
“पंतप्रधान मोदींकडे आता अन्य काही असल्याने आता त्यांनी महागठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे. जे स्वतः जातीयवादाच्या अभिशापाने पीडित आहेत ते लोकच जातीयवादी कसे काय असू शकतात ? मोदींना जन्मतः ओबीसी असल्याचा दाह सहन करावा लागला नाही. म्हणूनच ते अशी वक्तव्ये करतात”, असेही मायावती यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे मुद्दामहून स्वतःला ओबीसी म्हणवून घेत केवळ याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा आरोपही मायावती यांनी केला आहे.