नमोरुग्णांना मनाेरुग्णालयात भरती करा : मनसेचे पत्र

पुणे – मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात टीका केल्याप्रकरणी मनसेच्या पुणे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी येरवडा मनाेरुग्णालयास पत्र लिहून शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह नमाेरुग्णांना मनाेरुग्णालयात भरती करून घेण्याचे आवाहन केले आहे.
यादव यांनी पत्रात म्हटले की, राज ठाकरेंनी सरकारचा दुटप्पीपणा तसेच फसव्या याेजना पुराव्यासह जनतेसमाेर मांडत पाेलखाेल केली. या भाषणाचा विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी काैतुक केले. मात्र, विनाेद तावडे आणि नमाेरुग्णांना त्यांचे मुद्दे खोडणे शक्य नसल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
या नैराश्यातून हे नमाेरुग्ण वाचाळ बडबड व आक्षेपार्ह पाेस्ट करत आहे. हा सर्व प्रकार पाहता त्यांना मनाेरुग्णालयात दाखल करणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे. यासाठी तावडेंसह नमाेरुग्णांची मानसिक तपासणी करून त्यांना मनाेरुग्णालयात दाखल करून घ्यावे. या नमाेरुग्णांची संख्या लक्षात घेता त्यांना स्वतंत्र विशेष कक्षाची व्यवस्था करावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे नमाेरुग्णांना महाराष्ट्र सैनिकांकडून चाेप दिला जाऊ शकताे याची नाेंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.