breaking-newsक्रिडा

नमित मिश्रा, ऋषिकेश जोशी यांची विजयी आगेकूच कायम

  • रावेतकर करंडक सोलारीस क्‍लब अजिंक्‍यपद मालिका टेनिस स्पर्धा

पुणे- नमित मिश्रा, ऋषिकेश जोशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या सोलारीस क्‍लब तर्फे आयोजित “रावेतकर करंडक’ सोलारीस क्‍लब अखिल भारतीय अजिंक्‍यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (16 वर्षाखालील) स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

कोथरूड येथील सोलारीस क्‍लब, मयूर कॉलनी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन सोलारीस क्‍लबचे सीईओ ऋषिकेश भानुशाली यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक राजेश सपकाळ, मुख्य प्रशिक्षक रवींद्र पांड्ये, एमएसएलटीए निरीक्षक तनया गोसावी आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या मुलांच्या दुसऱ्या फेरीमध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यात नमित मिश्रा याने परीतोष पवार याचे आव्हान 8-7 (7-5) असे टायब्रेकमध्ये परतावून लावले. यावेळी सामन्यात दोन्ही खेळाडूंनी पहिल्या पासूनच वर्चस्व गाजविले. मात्र, ऐनवेळी आपल्या खेळात सुधारणा करत नमीत मिश्राने विजय नोंदवला. तर अन्य एका सामन्यात ऋषिकेश जोशी याने हर्ष ठक्कर याचा 8-4 असा एकतर्फी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रवण गाडगीळ आणि प्रसाद इंगळे यांनी पार्थ वमन व अदनान लोखंडवाला यांचा 8-1 अशा सारख्याच फरकाने पराभव करून तिसरी फेरी गाठली. याबरोबरच दक्ष अगरवाल, ओजस डाबस, साहील तांबट, यश पोळ, शौर्य राडे, इशान जिगाली यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल : 
दुसरी फेरी – प्रवण गाडगीळ वि.वि. पार्थ वमन 8-1, प्रसाद इंगळे वि.वि. अदनान लोखंडवाला 8-1, ओजस डाबस वि.वि. आर्यन कुरेशी 8-3, साहील तांबट वि.वि. सोहन काळगे 8-0, यश पोळ वि.वि. यश म्हसकर 8-1, शौर्य राडे वि.वि. आर्यन पंत 8-3, नमित मिश्रा वि.वि. परीतोष पवार 8-7 (5), दक्ष अगरवाल वि.वि. जय गाला 8-0, हृषीकेश जोशी वि.वि. हर्ष ठक्कर 8-4, इशान जिगाली वि.वि. श्‍लोक गांधी 8-1.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button