breaking-newsआंतरराष्टीय

नन होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि झाली पॉर्नस्टार

वयाची आठ वर्षे एका मुलीने नन (जोगीण) होण्याचे प्रशिक्षण घेतले. मात्र आपल्या या निर्णयाला अगदी उलट टर्न देत ती आता विख्यात पॉर्नस्टार झाली आहे. युडी पिनिडा असे या मुलीचे नाव आहे. मात्र आता ट्रेनी ननने आपण पॉर्नस्टार असल्याचे जाहीर केले आहे. युडी पिनिडा ही कोलंबियाची आहे. अगदी कमी वयापासून ती चर्चमध्ये जात असे. नन होण्याचा निर्णयही तिने घेतला होता. एवढेच नाही तर त्यासाठी आठ वर्षे प्रशिक्षणही घेतले. मात्र आता हा आपला निर्णय पूर्णपणे बदलत ती एक पॉर्नस्टार झाली आहे. कोलंबियात तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच तिचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मी शाळेत जात होते तेव्हा आमच्या शाळेत नन्स येत असत. त्यांना पाहून आपणही त्यांच्यासारखेच व्हावे असे मला वाटत होते म्हणून मी नन होण्याचे प्रशिक्षण घेतले. तिचे आठ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाले तेव्हा तिच्या धर्मगुरुंनी तू नन म्हणून कुठे काम मिळते का? हे पाहा असे तिला सुचवले. आपल्याला नन म्हणून कुठे काम मिळेल का? याचा शोध युडी घेत होती तेव्हाच तिची भेट जुआन बुस्टोशी झाली. जुआन बुस्टो हा अॅडल्ट वेबकॅम मॉडेल्सना काम मिळवून देतो. त्याच्याशी भेट झाल्यानंतर युडीने पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला.

मी पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतल्यावर मला थोडे वाईट वाटले. पण मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही. मी आताही चर्चमध्ये आवर्जून जाते, शुक्रवारी होणारी प्रार्थना कधीही चुकवत नाही असेही युडीने सांगितले. माझे काम चांगले आहे मला त्याची लाज वाटत नाही तसेच ते वाईट आहे असेही वाटत नाही असेही युडीने म्हटले आहे. टाइम्स नाऊ ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button