Mahaenews

नदी सुधार प्रकल्पांसाठी सल्लागार नेमणार

Share On

पिंपरी- शहराच्या हद्दीतून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.  पिंपरी पालिका नदी सुधार प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्यात येणार असून त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. 

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना व इंद्रायणी या गटारगंगा झाल्या आहेत. पालिकेचे शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात आहे.  त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत.

आता महापालिकेतर्फे शहरातून वाहणा-या पवना व इंद्रायणी या दोन नद्यांचा सुधार प्रकल्प राबविण्यासाठी अहमदाबाद येथील एच.सी.पी. डिझाइन, प्ल्रॅनिंग, मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. पवनेच्या शहरातील 18 किलोमीटरच्या पात्रासाठी या सल्लागाराला दोन कोटी 70 हजार, तर इंद्रायणीच्या 16 किलोमीटरकरिता एक कोटी 78 लाख 40 हजार रुपये दिले जाणार आहे.

Exit mobile version